शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आषाढी एकादशी :आकर्षक सजावट केलेल्या बसमधून माऊलींच्या पादुकांचे विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:28 PM

अलंकापुरीतून माऊलींच्या चलपादुका रवाना, विनाथांबा पायीवारी मार्गे प्रवास सुरू

ठळक मुद्देहरिनामाच्या जयघोषात माऊलींची वारी फुलांनी सजविलेल्या बसने पंढरीला रवाना

भानुदास पऱ्हाड  

आळंदी (शेलपिंपळगाव ) : "बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात माऊलींची वारी फुलांनी सजविलेल्या बसने पंढरीला रवाना झाली. आळंदीतून निघालेला वारीसोहळा विनाथांबा पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटणमार्गे सायंकाळी सहाच्या दरम्यान वाखरीत दाखल होईल.          तत्पूर्वी, पहाटे पाचला माऊलींच्या चलपादुकांची पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी ७ ते ९ ह.भ.प. धोंडोपंत बाबा अत्रेफड (पंढरपूर) यांचे कीर्तन झाले. दुपारी बाराला 'श्री'ना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यांनतर एकच्या सुमारास निवडक वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चलपादुका आजोळघरातून सजविलेल्या बसमध्ये विराजमान  करण्यात आल्या.  

           दरम्यान शासनाने उपलब्ध करून दिलेल्या बसची फवारणी करून लालपरीला निजंर्तुक करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास प्रांताधिकारी संजय तेली यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात तसेच ज्ञानोबा - तुकारामांच्या जयघोषात माऊलींची ही अनोखी वारी नगरपालिका चौकातून पंढरीकडे रवाना झाली. 

......................................

 हे गेले वारीला... पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक एकमधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिंडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनमधील श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनमधील भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई हे वीस मानकरी माउलींच्या पादुकांसोबत एसटीने पंढरपूरला गेले आहेत.               

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी