शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी शिवनेरीत आसने आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2015 01:24 IST

शिवनेरीत महिलांसाठी दहा आसने आरक्षित ठेवण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्याचबरोबर नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी

मुंबई : शिवनेरीत महिलांसाठी दहा आसने आरक्षित ठेवण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्याचबरोबर नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी २,२00 बसचे नियोजन करण्यात आले आले असून एसटी महामंडळ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या चर्चेला विराम देत दिवाकर रावते यांनी शनिवारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावते बोलत होते. शिवनेरी बस मुंबई-पुणे, औरंगाबाद-पुणेसह अन्य मार्गांवर धावत असून त्यामधून मोठ्या प्रमाणात महिला प्रवास करतात. हे पाहता त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय घेत असल्याचे रावते यांनी सांगितले. याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.त्याचबरोबर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महामंडळ सज्ज असल्याचे सांगत २ हजार २00 बसचे नियोजन करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी सहा नवीन बस स्थानके बांधण्यात आली असून कर्मचाऱ्यांही मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली जाणार असल्याचे रावते म्हणाले. हिरकणीत ‘पुश-बॅक’ आसनेसध्याच्या हिरकणी (निम-आराम) बसमधील आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आसन व्यवस्था ‘पुश बॅक’ (मागे होणारी आसने) केली जाणार असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असा दावा रावते यांनी केला. येत्या तीन महिन्यात यातील ३0 बस लवकरच दाखल होतील. एसटीत आता मराठी बाणाएसटीत आता मराठी बाणा दिसून येणार आहे. इंग्रजीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या पाट्या नियमानुसार मराठी करण्यात येणार आहेत. तसे शासनाचे आदेश असून त्याची अंमलबजावणी एसटीत केली जाणार आहे.