शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची घोषणा; निकष काय असतील याचा अंदाज लागेना; तीन वर्षांची माहिती भरण्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:26 IST

गटसचिवांचे असहकार आंदोलन स्थगित 

कोल्हापूर : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. गटसचिवांच्या असहकार आंदोलनामुळे माहिती वेळेत भरता येईल का? हा प्रश्न होता. पण शनिवारपासून गटसचिवांनी असहकार आंदोलन स्थगित करत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे काम सुरु केले आहे. हे जरी खरे असले तरी या कर्जमाफी योजनेबाबतचे निकष अद्याप गुलदस्त्यात असल्याने जिल्हा बँकेसह शेतकऱ्यांच्या पातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे.गटसचिवांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी गेल्या तीन आठवड्यापासून असहकार आंदोलन सुरु केले होते. कर्जमाफीसह इतर शासकीय कामकाजावर त्यांनी बहिष्कार टाकला होता. राज्य शासनाने शुक्रवारी सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफी व नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली. २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या तीन वर्षाची माहिती तातडीने भरण्याचे आदेश शासनाने दिल्याने गटसचिवांनी असहकार आंदोलन स्थगित करत कामाला सुरुवात केली आहे.हंगाम आणि आर्थिक वर्षाचा घोळ कायम राहणारकाेल्हापूर जिल्ह्यात उसाचे पीक असल्याने येथे विकास संस्थांच्या पातळीवर जून अखेर पीक कर्जाची परतफेड केली जाते. मात्र, कर्जमाफीमध्ये एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष निश्चित केले जाते. त्यामुळे एप्रिल ते जून अखेर कर्जाचे वाटप करुन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता सध्या तरी धूसर वाटत आहे.५६ कॉलममध्ये माहिती भरावी लागणारविकास संस्थांच्या पातळीवर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती भरायची आहे. ही माहिती ५६ कॉलममध्ये भरायची आहे. एखादा जरी कॉलम मधील माहिती चुकीची भरली तर लाभावर परिणाम होणार असल्याने सचिवांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.

केवळ पीक कर्जाच्या परतफेडीला लाभपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पीक कर्जाशिवाय शेती अनुषंगिक मध्यम मुदतीच्या कर्जाचा यामध्ये विचार केला जाणार नाही.

कर्जमाफीची घोषणा, चालू वसुलीवर परिणामराज्य सरकारने कर्जमाफी करणार असे सांगितल्यानंतर कर्ज परतफेडीवर परिणाम झाला आहे. शासन सप्टेंबर २०२५ अखेरचे थकीत कर्ज माफ करणार असले तरी चालू वसुल भरण्यास शेतकरी टाळाटाळ करू लागले आहेत. थकवणाऱ्यांना दोन लाखांची माफी आणि प्रामाणिकपणे फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये बक्षीस मिळत असेल तर पीक कर्ज थकीत ठेवलेले बरे, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. यामुळे विकास संस्था आर्थिक अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.

कर्जमाफीची माहिती भरायची असल्याने शेतकऱ्यांसाठी असहकार आंदोलन स्थगित केले आहे. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे काम सुरु झाले आहे. - प्रकाश तिपन्नावार (जिल्हा प्रतिनिधी, गटसचिव संघटना)

English
हिंदी सारांश
Web Title : Loan Waiver Announced; Criteria Unclear; Data Entry Commences in Kolhapur

Web Summary : Kolhapur farmers face uncertainty as the loan waiver criteria remain unclear. Data entry for regular payers has begun, despite initial reluctance. Confusion persists due to discrepancies between harvest seasons and financial years. Current loan recovery is affected by the announcement.