शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:08 IST

'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य 

फलटण : ‘एआय’चा वावर अनेक क्षेत्रात होताना दिसत आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने प्रवेश केला. माऊलींच्या पालखी सोहळ्यात एआय दिंडी पाहायला मिळाली. एआय दिंडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, तसे विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायांतील लोकांना सामावून घेण्यात येणार आहे. तसेच एआयच्या माध्यमातून वारीवर नजर असणार आहे.पालखी सोहळ्यानिमित्त आयटी दिंडीतील तरुणाईत एक वेगळाच उत्साह संचारला आहे. आयटी दिंडी आणि एआय दिंडी मिळून एकत्रित सुमारे तीन हजार लोक सहभागी होणार असून, यंदाच्या दिंडीत महाराष्ट्रासह दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई यासह विविध देशातील आलेल्या नागरिकांचाही सहभाग असणार आहे. वेगळ्या राज्यात, शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेली तरुणाई सुट्ट्या काढून हमखास वारीमध्ये सहभागी होणार आहेत.एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’दरम्यान, वारीची परंपरा मोठी आहे. या परंपरेची ओळख सांगणारी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही ‘एआय’ची दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरत आहे . ‘एआय’चा आध्यात्मिक इंटेलिजन्स नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ अशा ‘एआय’च्या घटकांचा मोठा खुबीने वापर करण्यात आला आहे.भक्ती आणि आधात्म याची माहिती सांगणार एआय हे वारीची परंपरा, भक्ती आणि आधात्म याची माहिती सांगणार आहे. तसेच वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे ‘भजनसंध्या आणि वारीतील खेळ’ आयोजित करण्यात आले होते . तर ज्या दिवशी ज्या टप्प्यावर 3 पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी पुण्याहून बसची व्यवस्था केली आहे. एआय ते अद्भुत अध्यात्मिक अनुभव ..एआय दिंडी ही नफा नसलेली संस्था असून, ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते. अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे, हा या वारीचा उद्देश आहे.'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य आयटी दिंडीत एक अभिनव उपक्रमही सुरू करण्यात येत असून, आता आयटी दिंडीचा प्रवास 'पुणे ते पंढरपूर ऑल इन्क्ल्युसिव्ह दिंडी' म्हणजेच 'एआय दिंडी' या नावाने होणार आहे. या एआय दिंडीमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असेल आणि फक्त आयटीतील नोकरदारच नव्हे तर वकिलांपासून ते डॉक्टरपर्यंत... शिक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत... अशा सर्वांना सामावून घेणाऱ्या एआय दिंडीत ते पायी चालणार आहेत. 'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य एआय दिंडीचे असणार आहे. एआय दिंडीचे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे.