शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सेना आमदाराची पोलीस निरीक्षकास मारहाण

By admin | Updated: December 18, 2014 05:24 IST

शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्याने येथे एकच गोंधळ झाला.

नागपूर : शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्याने येथे एकच गोंधळ झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्यावर भादंविच्या कलम ३२३, ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला. याआधीही मनसेत असताना आ. जाधव यांनी औरंगाबाद येथे पोलिसांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली होती. झाल्या प्रकाराबद्दल पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे स्वत: उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली. ठाकरे आज नागपुरात आले होते. हॉटेल प्राईडमध्ये शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या सूटमध्ये गेले. त्यानंतरही त्यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांचे येणे सुरूच होते. कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी रामदास कदम यांच्यावर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास एका मंत्र्यापाठोपाठ आ. जाधव हॉटेलमध्ये आले. कदम यांनी दार उघडले व मंत्र्यांना आत घेतले; मात्र जाधव यांना बाहेर थांबण्याचे सांगत दार लावून घेतले. त्यामुळे आ. जाधव चिडले. त्यांनी तेथे गोंधळ सुरू केला. पोलीस निरीक्षक पराग जाधव नाशिक येथील विशेष सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. ते अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आले आहे. आज त्यांना ठाकरे यांच्या सुरक्षा बंदोबस्ताचे प्रमुख म्हणून वरिष्ठांनी जबाबदारी सोपवली होती. गोंधळ होत असल्याचे पाहून त्यांनी आ. जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आ. जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. ही माहिती उद्धव ठाकरे यांना कळली. त्यामुळे त्यांनी पराग जाधव यांना बोलवून घेतले. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून तुम्ही या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास मोकळे आहात, असे सांगितले. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पराग जाधव पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आ. जाधव यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणेदार पी.आर. शहा यांनी दिली. (प्रतिनिधी)