शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आरिफच्या माहितीने संभ्रमात वाढ

By admin | Updated: December 2, 2014 04:34 IST

आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी

डिप्पी वांकाणी, मुंबईइस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेने इराक आणि सीरियात चालवलेल्या संघर्षातून परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिद याने दिलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा संभ्रमात पडल्या आहेत. सुरुवातीला आपण संघटनेकडून दर आठवड्याला मिळणाऱ्या पैशातून काही पैसे साठवून तुर्कस्थानमार्गे निसटून भारतात परतलो, असे त्याने सांगितले होते. आता त्याने म्हटले आहे, की आयएस ही संघटना त्यांच्या लढवय्यांवर कोणतीही बंधने घालत नाही आणि त्यांना आपल्या मर्जीनुसार लढ्यात सामील होण्याची किंवा सोडून जाण्याची मुभा आहे. इतकेच नव्हे, तर आपल्याला संघटनेने परत येताना २,००० अमेरिकी डॉलर्स दिले आणि तुर्कस्थानच्या सीमेपर्यंत आणून सोडले, असेही आरिफने सांगितले. आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी आहे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्या माहितीची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरिफवर लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येईल. आरिफच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याचे कल्याणहून आलेले तीन साथीदार इराकमधील बगदादहून मोसूलला गेले. तेथे ते त्यांची ओळख किंवा शिफारस करून देणाऱ्या व्यक्तीला भेटले. त्यानंतर संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांची ओळख पटवून घेतली आणि माहिती तपासली. आरिफच्या म्हणण्यानुसार, ही संघटना कोणालाही शिफारशीशिवाय किंवा ओळखीशिवाय लढ्यात सहभागी करून घेत नाही. संघटनेच्या गोटात शिरल्यावर त्यांना तेथे अनेक आशियाई वंशाचे लोक भेटले. त्यापैकी बहुसंख्य लोक पाकिस्तानी असल्याचे त्यांची भाषा आणि उच्चारांवरून लक्षात आले. युद्धक्षेत्रात हवाई आणि अन्य हल्ल्यांत अनेक जण मारले जात असल्याने दर शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर संघटनेच्या जिवंत लढवय्यांची मोजदाद केली जाते. त्याचवेळी नव्या लढवय्यांची भरती केली जाते. तसेच एखाद्याने परत जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला जाऊ दिले जाते. मात्र तपास यंत्रणा या माहितीवर सहजासहजी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे, की या संघटनेने आजवर दाखवलेली अमानुषता लक्षात घेता, ती आपल्या लढवय्यांना इतक्या सहजासहजी सोडणे शक्य नाही. तसेच आरिफने आपण कसे जखमी झालो याची कारणेही वेगवेगळी दिली आहेत. प्रथम त्याने सांगितले, की आपण प्रशिक्षणादरम्यान गोळी लागून जखमी झालो. नंतर तो म्हणाला, की त्याला खिडकी साफ करताना गोळी लागली. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की एखादा माणूस युद्धक्षेत्राच्या ऐन रणधुमाळीत खिडक्या कशाला पुसत बसेल. या सर्व प्रश्नांचा खुलासा आरिफच्या लाय डिटेक्टर चाचणीतून होण्याची शक्यता आहे.