Ashok Kharat Case : सावधान! अशोक खरात प्रकरणातील 'ते' व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत का? तातडीने करा डिलीट, अन्यथा थेट जेलमध्ये जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:09 IST2026-03-26T14:52:31+5:302026-03-26T15:09:15+5:30

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणावरून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Are 'those' videos from the Ashok Kharat case on your mobile? Delete them immediately, otherwise you will go straight to jail | Ashok Kharat Case : सावधान! अशोक खरात प्रकरणातील 'ते' व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत का? तातडीने करा डिलीट, अन्यथा थेट जेलमध्ये जाल

Ashok Kharat Case : सावधान! अशोक खरात प्रकरणातील 'ते' व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत का? तातडीने करा डिलीट, अन्यथा थेट जेलमध्ये जाल

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणावरून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. 

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

एसटीने अशोक खरात प्रकरणाचा तपास वाढवला असून कोर्टाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. आता खरात याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाची झडती पोलिसांनी घेतली आहे.

या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता यावर पोलिसांनी मोठी कारावाई केली आहे. राज्यात कोणीही हे व्हिडीओ फॉरवर्ड केल्यास कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर पीडितांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यास कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुकवर हे व्हिडीओ शेअर केल्यास त्या ग्रुपच्या अॅडमिनला थेट अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Are 'those' videos from the Ashok Kharat case on your mobile? Delete them immediately, otherwise you will go straight to jail