शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ‘डॅशिंग’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

By admin | Updated: January 4, 2015 00:53 IST

आयएएस, आयपीएस, आयएफएस दर्जाचे अधिकारी विदर्भात प्रशासकीय सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात ‘डेअर डॅशिंग’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या

मुख्यमंत्री लागले कामाला : १५ जानेवारीला होणार बदल्यांची यादी प्रसिद्धगणेश वासनिक - अमरावतीआयएएस, आयपीएस, आयएफएस दर्जाचे अधिकारी विदर्भात प्रशासकीय सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात ‘डेअर डॅशिंग’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार केली जात असून ती १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.गृहखाते मुख्यमंत्र्याकडे असल्यामुळे पोलीस खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागणार आहे. त्यानुसार ज्या आयपीएस अधिकाऱ्यांचा सेवा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, ज्यांनी बदलीसाठी अर्ज केला, अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस विभागात काही आयपीएस अधिकारी ‘डेअर डॅशिंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्यांना विदर्भात आणण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना अवगत केले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या राज्यभर बदल्या होत असल्या तरी यात विशेषत: ‘क्रिम’ अधिकारी हे विदर्भात गेले पाहिजे, त्याकरिता मुख्यमंत्रीच या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार करतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत विदर्भात सेवा नको म्हणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावेच लागेल. विशेषत: गडचिरोली, चंद्रपूर या नक्षली भागात होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठीसुद्धा ‘डेअर डॅशिंग’ पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी बदलीपात्र आयपीएस अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. मात्र काही आयपीएस अधिकाऱ्यांनी विदर्भात बदली होऊ नये, यासाठी भाजपच्या काही नेत्यांशी संपर्क साधण्याला प्रारंभ केला आहे.