शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळावर अखेर आयएएसची नियुक्ती

By admin | Updated: December 10, 2015 03:12 IST

३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आज आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला.

यदु जोशी,  नागपूर३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आज आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला. महामंडळात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महामंडळातील घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता. व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले पीयूष सिंग हे सध्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त आहेत. १ जानेवारी २०१५ पासून यशवंत मोरे (उपसंचालक; सामाजिक न्याय) यांच्याकडे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार होता. महामंडळातील घोटाळेबाजांविरुद्ध त्यांनी कठोर कारवाई केली.कोहलीला अखेर अटकसाठे महामंडळातील घोटाळ्यांप्रकरणी औरंगाबादचा अमरदीपसिंह कोहली याला आज सीआयडीने अटक केली. साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याकरता औरंगाबाद येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. तेव्हा रमेश कदम हा महामंडळाचा अध्यक्ष होता. महामंडळाचे १२ कोटी रुपये अर्धा एकर जमिनीच्या खरेदीसाठी कोहलीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. जमिनीचा हा भाव बघून तपास यंत्रणा चक्रावली होती. तसेच, त्याच्या सतनाम आॅटोमोबाइल या फर्मला ८ कोटी रुपये महामंडळाकडून देण्यात आले, अशी माहिती आहे. हा पैसा कशासाठी देण्यात आला, हे गौडबंगाल आहे.