शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्वकियांनी मदत न केल्यानेच घेतला भाजपात जाण्याचा निर्णय : धनंजय महाडिक

By appasaheb.patil | Published: September 01, 2019 5:40 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत होणार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश

ठळक मुद्दे- राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिकांचा आज भाजप प्रवेश- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार महाडिकांचा भाजप प्रवेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज समारोप

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मला खूप मदत केली, मात्र स्वकियांनी मला म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने आणि मदत न केल्याने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आपण वेगळा निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश करीत आहेत़ भाजप प्रवेशासाठी आज ते सोलापुरात दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे़ यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नेहमीच मला मदत केली. माझा कोणावरही राग नाही. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदारही झालो. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांची कामे व्हावी म्हणून मला वेगळा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही धनंजय महाडिक यांनी सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा