शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:53 IST

संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत.

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात मविआ आमदारांचे अर्धशतकही पूर्ण शकली नाही. अशातच विरोधकांच्या या आघाडीला आणखी एक धक्का बसला असून समाजवादी पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज याबाबतची घोषणा केली असून लवकरच आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतही चर्चा करू, अशी माहिती आझमी यांनी दिली आहे.

सत्ताधारी महायुतीवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी शपथ घेण्याचं टाळलेलं असतानाच महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी मात्र शपथ घेतली. त्यानंतर आमदार अबू आझमी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या कारणाविषयी बोलताना अबू आझमी म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत," असं आझमी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या एक्झिटमुळे आधीच संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवMahayutiमहायुती