शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा

By admin | Updated: January 30, 2015 05:15 IST

गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे.

मुंबई : गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या नियमावलीनुसार रिपाइंची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्यभर हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करताना रिपाइंच्या नावाने गटबाजी करणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याची टीका खंबाळकर यांनी केली. ते म्हणाले, ‘नियमानुसार दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होऊन सर्व धर्म आणि जातीच्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी देण्याची आवश्यकता आहे. मात्र बाबासाहेबांच्या नावाने कैक रिपब्लिकन नेत्यांनी रिपाइंच्या नावाने पक्ष काढून जनतेची फसवणूक केली आहे. या नेत्यांनी स्वत:ला आणि नातेवाइकांना सत्तेत वाटा मिळाल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचा विचारच केला नाही. मात्र आता पक्षाची पुनर्बांधणी करताना बाबासाहेबांच्या नियमावलीचे पालन करून राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय कोणतीही व्यक्ती आजन्म अध्यक्ष म्हणून राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल.’लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभर सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या कार्यकारिणीत खंबाळकर यांनी कोणतेही पद घेतले नसून राष्ट्रीय अध्यक्षपदी समाधान नारकर यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी रा.सू. गवई आणि के.एस. अहिरे उपस्थित होते.