शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:29 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

अहमदनगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघे निष्कलंक असून, त्यांच्यावर कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोटाळ्यांची कोणतीही प्रकरणं माझ्याकडे पाच वर्षांत आलेली नाही. तसेच नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांना फोन केल्यावर ते मला प्रतिसाद देतात, तसंच माझं ऐकतातही. केंद्रानं लोकपाल कायदा आणला असून, राज्यांनीही लोकायुक्त नियुक्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारविरोधात कोणतेही पुरावे नसल्यानं मी कोणाविरोधात आणि कशासाठी आंदोलन करू, असंही अण्णा हजारेंनी विचारलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहूनच राष्ट्रवादीतून अनेक नेते सोडून जात आहेत. साखर कारखाने आणि बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून, जसं करावं तसंच भरावं लागतं, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोक भाजपा घेत आहे. जनतेनं त्या भ्रष्ट लोकांचा निकाल लावाला, असं म्हणत अण्णा हजारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे