Anil Kapoor : 'अरे अनिल ! तुझा सिनेमा...' बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीत अनिल कपूरची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:21 IST2023-01-23T17:20:32+5:302023-01-23T17:21:48+5:30
बाळासाहेब ठाकरे आणि सिनेसृष्टीचं नातंही खूप जिव्हाळ्याचं होतं.

Anil Kapoor : 'अरे अनिल ! तुझा सिनेमा...' बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीत अनिल कपूरची भावूक पोस्ट
Anil Kapoor : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. विविध क्षेत्रातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. बाळासाहेब आणि सिनेसृष्टीचं नातंही खूप जिव्हाळ्याचं होतं. बाळासाहेबांचं कलाकारांसोबत छान नातं होतं. ते वेळोवेळी बॉलिवुड कलाकारांच्या मदतीला धावून गेले आहेत. अभिनेता अनिल कपूरनेहीबाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना अभिवादन केले आहे.
अभिनेता अनिल कपूरने ट्विटरवर एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो शेअर केला आहे. बाळासाहेबांसोबतचा हा फोटो आहे. बाळासाहेबांनी हात जोडले आहेत तर अनिल कपूर समोर उभा आहे. आठवणीतला हा फोटो पोस्ट करत अनिल कपूरने भावूक कॅप्शन लिहिले आहे. तो म्हणतो, 'जर निर्भयतेचा चेहरा असला असता तर तो बाळासाहेबांचाच असला असता. बुद्धीचातुर्य, नम्रता आणि प्रेरणादायी नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे एक होते. ते मला नेहमी म्हणायचे, अरे अनिल ! तुझा नवीन सिनेमा आलाय, अजुन दाखवला नाहीस ? तुमची आठवण येते बाळासाहेब.' अशा शब्दात अनिल कपूर व्यक्त झाला आहे.
If FEARLESSNESS had a face, it certainly belonged to BalaSaheb. One of those leaders who inspired me through his sense of humour, humility and strength! He will call me and say, अरे अनिल! तुम्हारी नई फ़िल्म लगी है! अभी तक दिखाई नहीं?” Miss you #BalaSaheb! 🙏 pic.twitter.com/G4EkXRB8I2
— Anil Kapoor (@AnilKapoor) January 23, 2023
बाळासाहेब ठाकरे आणि अनिल कपूर यांचे कौटुंबिक संबंध होते. बाळासाहेबांनी नेहमीच अनिल कपूरच्या अभिनयाचे मनमोकळेपणाने कौतुक केले आहे. चित्रपटसृष्टीही बाळासाहेबांच्या आठवणीत भावूक झाली आहे.