शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

अश्लील सीडीच्या अवैध धंद्याची माहिती समजल्याने अनिकेतची दिली सुपारी, भावाचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 10:35 AM

पोलिसांच्या थर्ड डिग्रीमध्ये मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या थर्ड डिग्रीमध्ये मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनिकेतची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे.

सांगली- पोलिसांच्या थर्ड डिग्रीमध्ये मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनिकेतची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे. अनिकेत ज्या ठिकाणी काम करत होता तेथे वरच्या मजल्यावर अश्लील सीडी बनविल्या जात होत्या. या अवैध धंद्यांची माहिती अनिकेतला मिळाली होती. ती माहिती तो बाहेर उघड करेल,त्यामुळे त्याची सुपारी युवराज कामटेला देण्यात आल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे.

अनिकेत हा हरभट रोडवरील एका बॅग्ज हाऊसमध्ये कामाला होता. या दुकानदाराने त्याचा पगार दिलेला नाही. त्यामुळे तो पगार मागण्यासाठी गेला असता, त्यांच्यात वाद झाला होता. या दुकानदाराचे व युवराज कामटे याचे जवळचे संबंध आहेत. त्याची या दुकानात ये-जा होती. शिवाय या दुकानाच्या वरच्या माळ्यावर मालक अश्लील चाळे करीत असतो. त्याची माहितीही अनिकेतने कुटुंबीयांना दिली होती. या दुकानदाराने अनिकेतच्या पत्नीलाही धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात या बॅग्ज हाऊसच्या मालकाचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

अनिकेतवर पोलीस ठाण्यात करणार अंत्यसंस्कारपोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह पोलिसांनी लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करून, त्याचा मृत्यू झालेल्या ठिकाणी पोलिस ठाण्यातच आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा इशारा कोथळे याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दिला. या प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच संशयित आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बनावट गुन्ह्यात अडकविलेअनिकेत व अमोल या दोघांनाही पोलिसांनी बनावट गुन्ह्यात अडकविल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. लूटमार प्रकरणातील फिर्यादी संतोष गायकवाड मूळचा कवलापूरचा आहे. तो मुंबईत राहतो. त्याला या दोघांची नावे कशी माहीत? चोरीचा बनाव करून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात केवळ अनिकेतलाच मारहाण करण्यात आली. अमोल भंडारेला पोलिसांनी मारहाण केलेली नाही. अनिकेतचा संगनमताने खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :crimeगुन्हेMurderखूनPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे