शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आॅनर किलिंग!

By admin | Updated: December 18, 2015 01:06 IST

बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन सख्ख्या भावांनी बुधवारी रात्री नवदाम्पत्याचा खून केल्याची संतापजनक घटना येथील कसबा बावडा परिसरात घडली.

कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन सख्ख्या भावांनी बुधवारी रात्री नवदाम्पत्याचा खून केल्याची संतापजनक घटना येथील कसबा बावडा परिसरात घडली. कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी सख्खे भाऊच बहिणीच्या जिवावर उठल्याचे सकृत्दर्शनी स्पष्ट झाले आहे.गणेश कॉलनीमध्ये इंद्रजीत श्रीकांत कुलकर्णी (२८) व मेघा (२१) या नवदाम्पत्याचा गणेश महेंद्र पाटील (२०), त्याचा सख्खा भाऊ जयदीप (१९, दोघे रा. थेरगाव) व मित्र नितीन रामचंद्र काशीद (२२, सातवे, ता. पन्हाळा) यांनी चाकूने भोसकून निर्घृणपणे खून केला. शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच आरोपींना अटक केली. गुरुवारी न्यायालयाने त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेघाचे बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील इंद्रजीत कुलकर्णीबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा तीव्र विरोध होता. तरीही, त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले. ते दोघे कसबा बावड्यातील गणेश कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहत होते. बुधवारी गणेश पाटीलच्या नातेवाइकांच्या विवाहात मेघाच्या लग्नाची चर्चा झाली. त्यातून गणेश व जयदीप यांचा राग अनावर झाला. रात्री १० वाजता दोघे जण त्यांचा मित्र नितीन काशीदला घेऊन दुचाकीवरून बहिणीकडे गेले. नितीन रस्त्यावर टेहळणी करीत थांबला होता. गणेश व जयदीप मेघाच्या घरात गेले. मेघाने आपले भाऊ आल्याचे पाहताच इंद्रजीतला दूध व इतर साहित्य आणण्यासाठी बाजारात पाठविले. इंद्रजीत बाहेर गेल्यावर मेघा चहा करण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली. त्या वेळी दोघा भावांनी तिच्या तोंडात बोळा कोंबून स्नानगृहात नेऊन तिच्यावर चाकूहल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने इंद्रजीत घरी आल्यानंतर गणेश व जयदीपने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. इंद्रजीत किंचाळल्याने घरमालकीण वंदना माधव जिन्याजवळ आल्या. त्या वेळी रक्ताने माखलेला चाकू घेऊन दोघे जण पळाल्याचे त्यांनी पाहिले. (प्रतिनिधी)