"नेकी कर और दारिया में डाल," देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:52 AM2021-10-09T10:52:00+5:302021-10-09T10:55:57+5:30

Amruta Fadnavis : त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत आणि अन्य राजकीय व्यक्तींच्या स्वभावाबाबत वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनाही एक सल्ला दिला.

amruta fadnavis speaks about how devendra fadnavis is said about uddhav thackeray rashmi thackeray | "नेकी कर और दारिया में डाल," देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

"नेकी कर और दारिया में डाल," देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

googlenewsNext
ठळक मुद्देत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबाबत आणि अन्य राजकीय व्यक्तींच्या स्वभावाबाबत वक्तव्य केलं.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनाही एक सल्ला दिला.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची ओळख जशी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अशी आहे, तशी त्यांची स्वतंत्र ओळखही आहे. त्या एक बँकर अॅक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट, गायिका म्हणूनही सर्वांच्या परिचयाच्या आहेत. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत फेस टू फेस या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी  आपण आई-वडिलांप्रमाणे डॉक्टर का झालो नाही आणि बँकिंग क्षेत्राकडे कसे वळलो, असा आपला जीवनप्रवास उलगडला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तीमत्त्व कसं आहे याबद्दलही सांगितलं.

"देवेंद्र फडणवीस हे असे व्यक्ती आहे जे ते विचार करतात तसंच तेच ते करतात. नेकी कर और दरिया में डाल असं त्यांचं व्यक्तीमत्त्व आहे. हा एक चांगला गुण आहे. परंतु ज्या ठिकाणी त्यांनी चांगलं राहू नये त्या ठिकाणीही ते चांगले राहतात, असं त्यांनी करू नये," असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. "त्यांच्या चांगल्या गुणापेक्षा हेच सांगता येईल की त्यांचं चांगलं स्थान आहे ते शिवसेनेचे प्रमुख," असं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना लवकरात लवकर महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करा असा सल्लाही दिला.

रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बोलतानाही त्यांनी त्या चांगल्या गृहिणी असल्याचं म्हटलं. "सध्या त्या वृत्तपत्राच्या संपादक आहेत. त्यांच्याकडे ते उच्च स्थान आहे. त्यांनी न्यूट्रलपणे सामनाचं काम करावं आणि तशा पत्रकारीतेला पाठिंबाही द्यावा," असंही फडणवीस म्हणाल्या.

असा झाला बँकिंग क्षेत्रात प्रवेश
"कॉमर्स आणि एमबीए करताना कॅम्पसमध्ये जो बेस्ट जॉब मिळेल तो अनुभवासाठी घ्यायचा असा विचार केला होता. त्याच पद्धतीनं कॅम्पसमध्ये अॅक्सिस बँकेचा जॉब मिळाला. त्या ठिकाणी काम करण्यासही आनंद मिळत होता. सारखी माझी डिपार्टमेंट्सही बदलली. कॅशपासून ट्रेजरी, ब्रान्च हेड, वेल्थ मॅनेजर अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला," असंही त्या म्हणाल्या. हा अनुभव आपल्याला जीवनातही कामी आला असं फडणवीस म्हणाल्या.

Web Title: amruta fadnavis speaks about how devendra fadnavis is said about uddhav thackeray rashmi thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.