Video - 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:21 PM2021-03-08T18:21:13+5:302021-03-08T18:32:11+5:30

Amruta Fadnavis New Song : "जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही!"

Amruta Fadnavis release new song on 8 march International Women’s Day 2021 | Video - 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं ऐकलंत का?

Video - 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं ऐकलंत का?

googlenewsNext

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. "कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी... हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्यासाठी!" असं म्हटलं आहे. 

अमृता फडणवीस यांनी याआधी "जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी!" असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी अमृता यांनी आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशारा देखील दिला होता.

अमृता फडणवीसांचं Valentine गिफ्ट; ‘हे’ नवीन गाणं ऐकलंय का?

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं होतं. ‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव होतं.

अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...

'झी म्यूझिक मराठी'च्या आगामी 'अंधार' या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत. अमृता फडणवीस देखील या गाण्याच्या व्हिडिओत दिसून येत आहेत. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

'ट्रोलर्स'चं केलं होतं स्वागत

अमृता फडणवीस याआधी त्यांच्या 'तिला जगू द्या', या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यावर अमृता फडणवीसांनी "मी नेहमी ट्रोलर्सचं स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणं थांबवणार नाही. माझं आणखी एक गाणं लवकरच येणार आहे", असं म्हटलं होतं. 

 

Web Title: Amruta Fadnavis release new song on 8 march International Women’s Day 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.