शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:54 IST

Amol Mitkari News: यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढील वर्षी अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करण्याबाबत विठुरायाला साकडे घालण्यात आले आहे.

Amol Mitkari News: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. एकीकडे महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले असताना दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याबाबत नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मते व्यक्त करताना दिसत आहेत.

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेसाठी सपत्नीक यावे, असे निमंत्रण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे वर्षा शासकीय निवासस्थानी देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला शेवटची शासकीय पूजा केली होती ती २०१९ मध्ये. आता पाच वर्षांनंतर येत्या ६ जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री म्हणून ते सपत्नीक ही महापूजा करतील. यातच पंढरपूर वारीला सुरुवात झाली आहे. मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याबाबत पांडुरंगाच्या चरणी साकडे घातल्याचे सांगितले जात आहे. 

पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील

मीडियाशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, मी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले. पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, अशी मन की बात अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान, खासदार सुनेत्रा पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हीदेखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आपण नेमही चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचे आणि काय द्यायचे नाही हे देवाच्या हातात असते. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील, असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीChief Ministerमुख्यमंत्री