शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये अमेरिकन गुंतवणूक!

By admin | Updated: December 17, 2014 00:36 IST

महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

उद्योजक उत्सुक : उद्योगस्नेही वातावरणाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही नागपूर : महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील २२ प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची रामगिरीवर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व सुविधायुक्त मिहानमध्ये आणि महाराष्ट्रात कुठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चेला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव (साप्रवि) पी.एस. मीना, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) सुमित मलिक, अप्पर मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव (उद्योग) अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी, महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्यमुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे अमेरिकेबरोबरच सर्व जगातील गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. रस्ते, रेल्वे, हवाई, बंदरे अशा सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा महाराष्ट्रात आहेत. मात्र उद्योग सुरू करताना ज्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात, त्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्र्यांचा समावेश असलेली एक आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरी अशा दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या व असलेल्या उद्योगांचा विस्तार करणाऱ्या सर्व उद्योगांचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी एपीसीओचे सुकांती घोष, आशिष दुबे, अ‍ॅमाझॉनचे मोहित बन्सल, बेकटॉन वरुण खन्ना, बोर्इंगचे प्रत्युषकुमार, हिंदुस्थान कोका-कोलाचे प्रसाद शिवलकर, कोलगेटचे नीलेश घाटे, कॉर्निंगचे रूस्तुम देसाई, डाटा कार्डचे राजीव सिंग, ऐजवुडचे विशाल वर्मा, जनरल मोटर्सचे पी. बालेंद्रन, हनीवेलचे वरुण जैन, जेबील सर्किटचे अनुपकुमार, मेहरोत्रा, सुनील नाईक, व्ही.व्ही. नाईक, कॅटरपिल्लरचे जावेद अहमद, आरजीपीचे महेश कृष्णमूर्ती, वरियन मेडिकलचे गिरीधरन अय्यर, वॉलमार्टचे क्रिश अय्यर व रजनीश कुमार, अ‍ॅमकेमचे अजय सिंघा, सुरभी वाहेल आदी उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावितयावेळी उद्योगसमूहाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा आपला अनुभव अतिशय समाधानकारक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ‘मेक इन महाराष्ट्र’संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे निर्णय घेतले, त्याबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यात आता अधिक स्वारस्य निर्माण झाल्याचे सर्र्वांनी आवर्जून सांगितले.