शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंट अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणार

By admin | Updated: June 10, 2015 01:37 IST

देशभरातील कॅन्टोन्मेंट ज्या कायद्यान्वये चालविले जात आहेत़ त्यामध्ये लवकरच दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी मंगळवारी दिली.

पुणे : कॅन्टोन्मेंटच्या हात-पायांना बेडी घातल्यासारखी परिस्थती निर्माण झाली आहे. नगरसेवकांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी देशभरातील कॅन्टोन्मेंट ज्या कायद्यान्वये चालविले जात आहेत़ त्यामध्ये लवकरच दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी मंगळवारी दिली. सदर्न कमांडअंतर्गत येणाऱ्या १९ कॅन्टोन्मेंटच्या नगरसेवकांसाठी पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राव इंद्रजित सिंह यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप झाला. यावेळी आर्मी कमाडंन्ट अशोक सिंग, प्रधान निदेशक योगेश्वर शर्मा, महानिदेशक रविकांत चोपडा उपस्थित होते.राव इंद्रजित सिंह म्हणाले, ‘‘इंग्रज देश सोडून जाताना ते कॅन्टोन्मेंट इथे सोडून गेले. आता त्यांची सेना नाही, त्यामुळे देशाच्या सैन्याचे मनोधैर्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. १९६२ मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धावेळी सैन्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महिलांनी त्यांचे मंगळसूत्र विकून सैनिकांसाठी पैसे पाठविले. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता सैन्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.’’कॅन्टोन्मेंटमध्ये नगरसेवक लोकांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले गेले पाहिजेत. लोकांना सुविधा देण्यासाठी कॅन्टोन्मेंटने तत्पर असले पाहिजे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी नगरसेवकांना भेटत नाहीत अशा तक्रारी होत्या. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकाच ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी नगरसेवकांना मिळाली असल्याचे राव इंद्रजित सिंह यांनी सांगितले.देवळाली कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष एस. केशव रेड्डी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)