शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘निवडणुका आल्या की, आंबेडकरांचे स्मारक आठवते’

By admin | Updated: February 5, 2017 00:43 IST

निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची

आश्वी (जि.अहमदनगर) : निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या निझर्णेश्वर येथील प्रचाराप्रसंगी ते म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली. दोन वर्षे दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली? याची तुलना करा. नोटाबंदीमुळे केंद्र सरकारकडे १६ लाख कोटी रुपये जमा झाले असतील तर, तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी या सरकारने कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षांची रोजच जुगलबंदी पाहत आहोत. दोन्ही पक्षांमध्ये तडीपार गुंड व गुन्हेगारांना खुलेआम प्रवेश देणे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित होत असून राज्य पिछेहाटीवर जात आहे, असे विखे यांनी सांगितले. (वार्ताहर)