Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:20 IST2025-11-07T10:18:55+5:302025-11-07T10:20:31+5:30
Ambadas Danve And BJP : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात मुंबईत विरोधी पक्षांनी 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट यांच्यासह मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्या. ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. विरोधक मतचोरीविरोधात आक्रमक होत असतानाच आता खतचोरी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. "भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खात आहे. पावसाच्या अस्मानीने लुटल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपाचे लोक अशा 'सुलतानी' पद्धतीने लुटताहेत. मेवाभाऊंची खंबीर साथ... बोगस धंद्यात घालू हात..." असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहेत. तसेच काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा \'खतचोरी\'चा एपिसोड..
\— Ambadas Danve (@iambadasdanve) November 6, 2025
मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप… pic.twitter.com/r6ERvmRmo9
"भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"
"वोटचोरी नंतर सादर आहे भाजपाचा 'खतचोरी'चा एपिसोड... मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पाहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजपा कार्यकर्ते सर्रास करत आहेत. सरकारी बॅगला बाजारात साधारण ११५० रुपये एवढा भाव आहे. इथे भाजपाच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे!"
"मेवाभाऊंची खंबीर साथ, बोगस धंद्यात घालू हात..."
"पावसाच्या अस्मानीने लुटल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपचे लोक अशा 'सुलतानी' (की मुलतानी ) पद्धतीने लुटत आहेत. ही खतचोरी करणाऱ्या एका एका माणसाचे नाव मला माहिती आहे. हा खत'जिहाद' करणारा भाजपा कार्यकर्ता नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावं! मेवाभाऊंची खंबीर साथ... बोगस धंद्यात घालू हात..." असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.