शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

By admin | Updated: July 14, 2017 03:34 IST

तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला

पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला. मात्र त्यासाठी एनपीआयसीएल ने रोखून ठेवलेले ४० कोटींचे बिल तातडी न दिल्यास या कामगारांचे पुढील वेतन रोखण्याचा निर्णय तारापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने घेतला आहे. तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चार व भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही प्रकल्पात व कर्मचारी वसाहतीमध्ये २०१४ सालापासून सुमारे अडीच ते तीन हजार पुरुष व महिला कंत्राटी कामगार काम करीत होते. या कामगारांच्या किमान वेतनात १५० रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे गॅझेट उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे ते तत्काळ देता आले नाही. १० सप्टेंबर २०१४ रोजी तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने (एन पी सी आय एल) नोटीस काढून कामगारांना सहा महिन्याच्या काळातील अतिरिक्त वाढीव रक्कम देण्याचे कंत्राटदारांना आदेश दिले.या नुसार कंत्राटी कामगारांना वाढीव रक्कम देण्यात ही आली मात्र कंत्राटदारांच्या अकाउंटमध्ये त्या रक्कमेची नोंद ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून करण्यात आली ही रक्कम दिवसेंदिवस वाढत गेल्याने ती देण्यास कंत्राटदारांनी असमर्थता दखविल्यानंतर काहींचे कॉन्ट्रॅक्टच बंद करण्यात आले तर अनेकांचे कामगार कमी केले. एनपीसीआयएल व्यवस्थापन अतिरिक्त रक्कम बाबत योग्य निर्णय घेत नसल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्रातील कंत्राटदार एकत्र येवून तारापूर काँटॅ्रक्टर असोसिएशनची स्थापना करून मुंबई सायन येथील केंद्रीय श्रम विभागाच्या असिस्टंट लेबर कमिशनर यांचे दरवाजे ठोठवाले त्यांनीही वाढीव रक्कम देण्याची जबाबदारी ही प्रिन्सीपलची असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही ४० कोटींची बिले तातडीने दिली नाही व किमान वेतनाची फरकाची रक्कम दिली नाही तर कंत्राटींचे पुढील वेतन रोखण्याचा इशारा असोसिएशने दिला आहे.कंत्राटदार म्हणतात ...तर आत्महत्या करावी लागेल !मात्र त्या नंतरही कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये झालेल्या वृद्धीच्या पोटी अतिरिक्त रक्कम देण्याबाबत तारापूर अणुऊर्जा केंद्र व्यवस्थापनााने ठोस निर्णय घेतला तर नाहीच उलट शंभर ठेकेदारांच्या साडेचारशे बिलांच्या सुमारे ४० कोटीची बिल रोखून ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आली तशी आत्महत्या करण्याची पाळी आमच्यावर येईल असे कंत्राटदारानी सांगून कंत्राटी कामगारांना बोनसची रक्कम दिल्याचे व अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अ‍ॅडव्हान्सची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप एनपीसीआयएलवर केला आह.