वाडा नगरपंचायतीसाठी सर्वपक्षीय एकवटले

By Admin | Updated: May 19, 2016 04:04 IST2016-05-19T04:04:49+5:302016-05-19T04:04:49+5:30

वाडा ग्रामपंचातीला डावलल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर वाडा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा

Alliance for the Wada Nagar Panchayat | वाडा नगरपंचायतीसाठी सर्वपक्षीय एकवटले

वाडा नगरपंचायतीसाठी सर्वपक्षीय एकवटले


वाडा : राज्य शासनाने नुकतीच पालघर जिल्हयातील विक्रमगड, मोखाडा व तलासरी या ग्रामपंयातींना नगरपंचायतीचा दर्जा दिल्याची घोषणा केली. मात्र त्यातून वाडा ग्रामपंचातीला डावलल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर वाडा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन आज वाडा तहसीलदारांना सर्व पक्षीयांच्या वतीने देण्यात आले.
वाडा तालुक्यात मोठया प्रमाणात औद्यगिकरण वाढल्याने वाडा गावात नगरीकरण झपाटयाने वाढत आहे. त्यामूळे नागरिकरणाच्या समस्या वाढत आहेत.त्याचा ताण ग्रामपंचातीवर पडत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाडा ग्रामपंचायत सक्षम नाही. त्यामुळे वाडा ग्रामपंचायतीला नगरपंचायत करावी अशी मागणी करणारे निवेदन आज वाडा तहसिलदारांना सर्व पक्षीयांच्या वनिे देण्यात आले यावेळी भाजपाचे वाडा तालुकाध्यक्ष संदीप पवार, राष्ट्रवादी-काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पठारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, श्रमजिवी संघटनेचे सरचिटणीस जिय जाधव, बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष अनंता भोईर, सचिन अनंत सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Alliance for the Wada Nagar Panchayat