शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोरोना काळात मद्यपान शरीरासाठी घातकच : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:20 IST

मद्यपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, यकृत रोग व कर्करोगाचा धोका वाढण्यासह विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात...

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या विश्रांतीनंतर दुकाने उघडण्यास दिली परवानगी मद्यपानाचा थेट संबंध न्यूमोनिया व इतर फुफ्फुसीय रोगांशी जोडलेलाशरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे समर्थन करणार्‍या कोट्यावधी सूक्ष्मजीवांच्या क्षमतेवर परिणाम दुकाने सुरु होताच वाइन शॉप्सभोवती प्रचंड गर्दी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर

पुणे : सध्या जगभरात कोरोनासारख्या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. अशावेळी मद्यपान आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते. मद्यपानाचा थेट संबंध न्यूमोनिया व इतर फुफ्फुसीय रोगांशी जोडलेला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, यकृत रोग व कर्करोगाचा धोका वाढण्यासह विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी मद्यपानापासून दूर राहणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या विश्रांतीनंतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र दुकाने सुरु होताच वाइन शॉप्सभोवती प्रचंड गर्दी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गर्दी करताना अशावेळी आरोग्यविषयक नियम पाळले जात नाहीत, याकडे तज्ञांनी लक्ष वेधले आहे. मद्यपानामुळे आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आतड्याच्या रचनेमध्ये बदल होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे समर्थन करणार्‍या कोट्यावधी सूक्ष्मजीवांच्या क्षमतेवर परिणाम होतो. मद्यपानामुळे आतड्यांमधील पेशींचे नुकसान होते. परिणामी जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध संरक्षण देणारी पहिली फळी निष्प्रभ होते.आतड्यांमधील पेशींचे नुकसान झाल्याने विषाणूंना आपल्या रक्तप्रवाहात जाणे सुलभ होते. म्हणजेच मद्यपान करून आपण शरीराची बचावात्मक यंत्रणा कमकुवत करतो. ज्यामुळे सर्दी, विषाणू, इतर जिवाणू किंवा विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करणे अवघड होते. अगदी थोड्या काळासाठीही मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक ठरु  शकतेअसा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे......चौकटआपली रोगप्रतिकारक शक्ती खराब झाल्याने शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. अल्कोहोल जर्नलच्या 2015 च्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, संक्रमणाच्या वेळी रक्तातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होऊ शकते. मोनोसाइट्स म्हणून ओळखले जाणार्‍या पेशींचे हे प्रमाण कमी होताच तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यासाठी कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात मद्यपान टाळणे हाच उत्तम पर्याय आहे, असा सल्ला डॉ. महेश लाखे, संसर्गजन्य तज्ञ कोलंबिया एशिया हॉस्पिटल.........

लॉकडाउन ही व्यसनातून मुक्त होण्याची एक उत्तम संधी.. 

मनोरुग्ण-तज्ञांच्या मदतीने लॉकडाउन ही व्यसनातून मुक्त होण्याची एक उत्तम संधी होती. यासाठी डॉक्टरांनी विविध सोशल मीडियावर सल्ला देखील दिला होता. मात्र ही कल्पना लोकांना रुचली नसावी. मद्यपान आणि बेरोजगारी ही व्यसनाधीन व्यक्तींना दुहेरी हानी पोहोचू शकते. अनेक अभ्यास आणि सर्वेक्षणांद्वारे मद्यपान हे घरगुती हिंसाचार, आत्महत्या, गुन्हे आणि विविध आरोग्यविषयक गुंतागुंतांशी संबंधित असल्याचे नोंदवले गेले आहे. पुरेशी कालावधीसाठी योग्य मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे हाच मेंदू विकार व अप्रिय वर्तणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या व्यसनापासून मुक्त होण्याचा एकमात्र उपाय आहे-  डॉ. राहुल बागले, शरीररशास्त्र तज्ञ

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यliquor banदारूबंदीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस