“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:40 IST2026-01-13T09:39:04+5:302026-01-13T09:40:17+5:30
Thackeray Group Ambadas Danve News: वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे, आतून मात्र सत्तेसाठी 'अकोट पॅटर्न' राबवायचा, हा भाजपाच्या लेखी 'जनमताचा आदरच' ठरतो नाही का, अशी टीका करण्यात आली आहे.

“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
Thackeray Group Ambadas Danve News: एकीकडे राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच अकोट नगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर जुळून आलेल्या समीकरणांची चर्चा राज्यभरात सुरू असून, यावरून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला असून, चक्क एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे.
अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून, भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले आहे. एकीकडे राज्याच्या राजकारणात पक्ष एकमेकांसमोर उभे असताना, अकोटमध्ये मात्र विकासाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि एमआयएम हे सर्वच वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकाच छताखाली आले आहेत. सत्तेसाठी भाजपने कट्टर विरोधकांसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून टीकास्त्र डागले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपावर निशाणा साधला.
राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न
भाजप+एमआयएम=अकोट पॅटर्न. भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट 'एमआयएम'च्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. 'राष्ट्रभक्तीचा' नवा अध्याय लिहिणाऱ्या या 'फेव्हीकॉल' युतीसाठी अभिनंदन. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे आणि आतून मात्र सत्तेसाठी 'अकोट पॅटर्न' राबवायचा, हा भाजपच्या लेखी 'जनमताचा आदरच' ठरतो नाही का, असे अंबादास दानवे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या आघाडीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले. अकोटमध्ये भाजपाने एमआयएमसोबत युती केल्याने राज्यभरात विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले. या घटनेवरून अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. विरोधकांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही असे सांगत सावरकरांनी एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्षाशी फारकत घेतल्याचा दावा केला.
भाजप+एमआयएम=अकोट पॅटर्न
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 13, 2026
भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट 'एमआयएम'च्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. 'राष्ट्रभक्तीचा' नवा अध्याय लिहिणाऱ्या या 'फेव्हीकॉल' युतीसाठी अभिनंदन @Dev_Fadnavis जी!
वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक…