शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:36 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेच आता राष्ट्रवादीत घडत आहे.

 अजित पवारांनी आज शरद पवारांवर चांगलेच शरसंधान साधले. काँग्रेसविरोधी भुमिका ते शरद पवारांच्या अगदी परवाच्या राजीनामा नाट्यावर अजित पवारांनी तोंडसुख घेतले आहे. अजित पवारांच्या वादळी भाषणानंतर एक मोठी अपडेट हाती येत आहे. अजित पवारांनी कायदेशीर लढाई सुरु केली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने लढण्यासाठी अजित पवार निघाले आहेत. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्हावर दावा केला आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी दावा केल्याचे वृत्त एनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. निवडणूक आयोगाला अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी याचिका प्राप्त झाली आहे. तर जयंत पाटील यांनी ९ मंत्र्यांच्या अपात्रतेची कारवाई करणारी कॅव्हेट निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यावर  सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहे. तसेच राष्ट्रवादीचे झाले तर अशा चिंतेत कार्यकर्ते आहेत. जे गेल्या १ वर्षात झाले तेच आता पुन्हा गिरविले जात आहे. यामुळे पुढचे डावपेच काय असतील, कोण काय कार्ड खेळेल यावर पुढील राजकारण रंगणार आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग