अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

By हेमंत बावकर | Published: October 26, 2020 07:00 PM2020-10-26T19:00:02+5:302020-10-26T19:01:01+5:30

Ajit Pawar corona Positive: अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar will resume work in five days after corona Positive; Rajesh Tope says | अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

googlenewsNext

राष्ट्रवादीचे राज्यातील मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले असले तरीही राज्यात चर्चा सुरु आहेत. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 


अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर त्यांच्या प्रकृतीवरून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. अजित पवारांना अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. त्यांनी त्यावेळच्या बैठकांमध्ये जवळच्या व्यक्तींनाही लांब राहण्यास सांगितले होते. सुप्रिया सुळेंनाही त्यांनी लांब थांबण्यास सांगितले होते. 


आज टोपे यांनी पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. यामध्ये त्यांनी अजित पवार पाच दिवसांत पुन्हा राज्याच्या सेवेत असतील, असे सांगितले. अजित पवार हे शिस्तीचे असल्याने त्यांना सर्व गोष्टी नीट व्हाव्यात असे वाटत होते. यामुळे ते कोरोना काळात दौरे, बैठकांचे सत्र करत होते. मात्र, काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.


कोरोना झाल्यानंतर विश्रांतीची गरज असते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने आयसोलेट झाले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याचे ते पालन करत आहेत, असे टोपे म्हणाले. 
 

Web Title: Ajit Pawar will resume work in five days after corona Positive; Rajesh Tope says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.