शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 15:09 IST

पारनेरमधील राजकारणावर अजित पवार यांचं भाष्य

मुंबई: राज्यात एकत्र सत्तेत असताना गेल्याच आठवड्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोरोना संकट काळात सत्तेतल्या पक्षांमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यानं यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. गेल्या शनिवारी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलेल्या पाचही नगरसेवकांनी काल स्वगृही परतण्याचा निर्णय घेत हातावर पुन्हा शिवबंधन बांधलं. त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. या सगळ्या घटनाक्रमावर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.सारथी संस्थेशी संबंधित बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरमधील फोडाफोडीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. 'शनिवारी मी बारामतीत होतो. त्यावेळी आमदार निलेश लंके मला भेटण्यासाठी आले. काही अपक्ष नगरसेवकांना पक्षात यायचं आहे, असा निरोप त्यांनी पाठवला. त्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांच्या गळ्यात पक्षाचा गमछा घालून त्यांचं स्वागत केलं,' असं अजित पवारांनी सांगितलं.'पक्षात आलेले नगरसेवक शिवसेनेचे असल्याचं नंतर मला समजलं. त्यानंतर मी लगेच आमदार निलेश लंके यांच्याशी बोललो. ते पाच नगरसेवक भाजपामध्ये जाणार होते. राष्ट्रवादीत प्रवेश मिळत नसेल तर आम्ही भाजपामध्ये जाऊ, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी तुमच्याकडे आणलं, अशी माहिती लंके यांनी दिली. त्यावर सत्तेत सोबत असलेल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची फोडाफोड करणं योग्य नाही, असं लंके सांगितलं', अशी माहिती अजित पवारांनी दिली.पक्षात अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये होती. त्यावर तुमच्या समस्या तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा. उद्धव ठाकरे त्या नक्कीच दूर करतील, असं आवाहन पाच नगरसेवकांना केलं. त्यानंतर त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या राजकारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थीशिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस