Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. सीआयडीने काल पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंह चौकशीसाठी दाखल झाले होते. यावेळी सिंह यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहेत. काल व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंह हा पुण्यात सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाला की पाहुणचारासाठी असा सवालही पवार यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून व्ही. के. सिंह यांची ८ तास चौकशी केल्याचा दावा केला जात आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांचा बहुतांश वेळ हा पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या बडदास्तीत आणि पाहुणचारातच गेला, असंही ट्विटमध्ये पवार यांनी म्हटले आहे.
चौकशी संपल्यानंतर व्ही. के. सिंह यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे नव्हे, तर 'व्हीआयपी' पाहुण्याप्रमाणे पोलिसांच्या काळ्या काचा लावलेल्या गाडीतून सन्मानाने सोडण्यात आले.
"ज्यांच्या विमानाने अजितदादांना हिरावून नेलं, त्यांना कोणाच्या आशीर्वादाने अशी वागणूक दिली जाते?" असा सवाल करत यामागे मोठे 'काळंबेरं' असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
तपास यंत्रणांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट
एकीकडे आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत अद्याप FIR नोंदवून घेतला जात नाही, ही लोकशाहीची थट्टा आहे. या प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अत्यंत चुकीची वागणूक दिली, जे निषेधार्ह आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
"अजितदादांसोबत काम केलेले आणि स्वतःला त्यांचे 'विश्वासू' म्हणवणारे सत्ताधारी आमदार आता तरी या अन्यायाविरोधात जागे होतील का?" असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे. सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
Web Summary : Rohit Pawar alleges VIP treatment for V.K. Singh, owner of VSR company, during the Ajit Pawar plane crash investigation. He questions the lack of FIR and criticizes the treatment of journalists, suspecting a cover-up. He challenges ruling MLAs to speak out.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार विमान दुर्घटना जांच के दौरान वीएसआर कंपनी के मालिक वी.के. सिंह को वीआईपी ट्रीटमेंट देने का आरोप लगाया। उन्होंने एफआईआर की कमी पर सवाल उठाया और पत्रकारों के साथ व्यवहार की आलोचना की, एक कवर-अप का संदेह जताया। उन्होंने सत्तारूढ़ विधायकों को बोलने की चुनौती दी।