शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:32 IST

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्राथमिक अहवालात जाणीवपूर्वक चुका केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीला कोणाचा वरदहस्त? बारामती विमानतळावर रेकी झाली होती का? सविस्तर वाचा.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटल्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील त्रुटींवरून थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर निशाणा साधला आहे. या अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा जळजळीत सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा आत्मविश्वास कुणामुळे?रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या (व्हीएसआर) मालकावरही गंभीर आरोप केले आहेत. "आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, सरकार आमची विमाने वापरत आहे," असा दावा कंपनीचे मालक करत असल्याचे पवारांनी सांगितले. कंपनीला हा आत्मविश्वास नेमका कोठून मिळतो आणि त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, अशी विचारणा त्यांनी केली. अहवालातील चुका या अपघाताचे गांभीर्य कमी करण्यासाठीच केल्या गेल्या असल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी?या प्रकरणात एक नवीन आणि खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. अपघातापूर्वी बारामती विमानतळ परिसरात काही संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, सीआयडी (CID) आणि सीआयबीने (CIB) यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या रेकीचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, हे शोधणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Accident: Baramati Airport Recce? Rohit Pawar's Claim Stirs Controversy.

Web Summary : Rohit Pawar alleges flaws in Ajit Pawar's plane accident report, questioning DGCA's motives. He claims the involved aviation company boasts of government patronage. Suspicious individuals allegedly surveyed Baramati airport before the incident, demanding CID/CIB investigation.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार