शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:23 IST

Ajit Pawar Plane Crash Reasons: अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर आली आहेत. विमानाचा वेग १८३ नॉट्स इतका जास्त का होता? 'टेबलटॉप रनवे' नडला का? वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला असतानाच, आता या भीषण दुर्घटनेमागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर येत आहेत. बारामतीमधील 'टेबलटॉप रनवे' आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा 'असामान्य वेग' यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज बारामतीच्या विमानतळाचा दांडगा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने वर्तवला आहे.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, अजित पवारांचे विमान धावपट्टीकडे येत असताना ते 'अनस्टेबल' होते. जमिनीपासून ५०० फूट उंचीवर असताना विमानाचा वेग १८३ नॉट्स होता, जो वास्तविक १०६ ते १३५ नॉट्स दरम्यान असायला हवा होता. मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्याने विमानाचे लँडिंग सुरक्षित करणे कठीण झाले, असे मत या वैमानिकाने मांडले. 

तसेच बारामती विमानतळाचा रनवे हा 'टेबलटॉप' स्वरूपाचा आहे. अशा रनवेच्या दोन्ही टोकांना किंवा एका बाजुला खोल दरी किंवा उतार असतो, ज्यामुळे लँडिंगसाठी अत्यंत अचूकतेची गरज असते. बारामतीमध्ये ILS नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून विमान उतरावे लागते. या स्थितीत थोडा जरी अंदाज चुकला, तरी विमान धावपट्टीवरून घसरण्याचा धोका असतो.

'गो-अराउंड' न करण्याचा निर्णयविमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग रद्द करून 'गो-अराउंड' केले होते. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वेग जास्त होता, तेव्हा पुन्हा 'गो-अराउंड' करणे आवश्यक होते. पण वैमानिकांनी लँडिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, जो जीवघेणा ठरला, असे मत या वैमानिकाने मांडले. 

शेवटच्या मिनिटाचा गूढ संवादनागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सकाळी ८:४३ वाजता एटीसीने (ATC) धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याची परवानगी दिली होती. मात्र, वैमानिकांनी या परवानगीचा 'रीडबॅक' (प्रतिसाद) दिला नाही. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात विमानात आग लागल्याचे दिसून आले. आजतकने याबाबतचे वृतत् दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane mishap: Speed, runway, pilot's decision under scrutiny.

Web Summary : Ajit Pawar's plane crash likely due to excessive speed and Baramati's challenging 'tabletop' runway. A senior pilot suggests a 'go-around' should have been attempted during the second landing. Communication failure with ATC also raises concerns.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस