शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज! अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले? तांत्रिक बिघाड की आणखी काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:21 IST

Ajit Pawar Plane Crash CCTV Mystery: सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात रूपांतर झाले.

बारामती (पुणे): अजित पवार यांच्या विमान अपघाताचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये दिसणारी दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत. हे विमान धावपट्टीच्या दिशेने सरळ रेषेत येत असताना, लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद आधी अचानक डाव्या बाजूला झुकले आणि जमिनीवर आदळले. या 'सडन टिल्ट'मुळे हा घातपात की तांत्रिक बिघाड, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात रूपांतर झाले.

शरद पवारांचे महत्त्वाचे आवाहनअपघातानंतर राजकीय वर्तुळातून विविध शंका उपस्थित केल्या जात असताना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, "हा एक दुर्दैवी अपघात आहे, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्राने एक कार्यक्षम नेता गमावला आहे, अशा वेळी चुकीच्या चर्चा करून वातावरण कलुषित करू नका." ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनी यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली असताना शरद पवारांनी मात्र याला 'केवळ अपघात' मानण्याचे आवाहन केले आहे.

विमान कंपनीचा दावा 'विमानात बिघाड नव्हता': विमान ज्या कंपनीचे होते VSR Aviation, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी स्पष्ट केले आहे की, विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमानाची देखभाल वेळोवेळी केली गेली होती आणि वैमानिकही अनुभवी होते. त्यांच्या मते, कमी दृश्यमानता हेच अपघाताचे प्रमुख कारण असू शकते.

तांत्रिक शक्यता काय? तज्ज्ञांच्या मते, विमान 'वाकडे' होण्यामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात:

विंड शियर : लँडिंगच्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक बदलल्याने विमान एका बाजूला फेकले जाऊ शकते.

इंजिनमधील बिघाड: शेवटच्या क्षणी एका इंजिनने काम करणे थांबवल्यास विमान 'असिमेट्रिक थ्रस्ट'मुळे एका बाजूला झुकू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : CCTV Footage Raises Questions: Ajit Pawar's Plane Crash Mystery Deepens

Web Summary : CCTV footage shows Ajit Pawar's plane suddenly tilting before crashing, sparking debate about technical failure or foul play. Sharad Pawar urges against politicizing the accident. The aviation company denies any malfunction, citing low visibility. Experts suggest wind shear or engine failure as potential causes.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार