धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज! अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले? तांत्रिक बिघाड की आणखी काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:21 IST2026-01-28T20:20:45+5:302026-01-28T20:21:08+5:30

Ajit Pawar Plane Crash CCTV Mystery: सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात रूपांतर झाले.

Ajit Pawar Plane Crash CCTV Mystery: CCTV footage adds to the mystery! Why did Ajit Pawar's plane, which was landing in a straight line, suddenly bend? Technical failure or something else... | धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज! अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले? तांत्रिक बिघाड की आणखी काही...

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज! अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले? तांत्रिक बिघाड की आणखी काही...

बारामती (पुणे): अजित पवार यांच्या विमान अपघाताचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये दिसणारी दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत. हे विमान धावपट्टीच्या दिशेने सरळ रेषेत येत असताना, लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद आधी अचानक डाव्या बाजूला झुकले आणि जमिनीवर आदळले. या 'सडन टिल्ट'मुळे हा घातपात की तांत्रिक बिघाड, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात रूपांतर झाले.

शरद पवारांचे महत्त्वाचे आवाहन
अपघातानंतर राजकीय वर्तुळातून विविध शंका उपस्थित केल्या जात असताना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, "हा एक दुर्दैवी अपघात आहे, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्राने एक कार्यक्षम नेता गमावला आहे, अशा वेळी चुकीच्या चर्चा करून वातावरण कलुषित करू नका." ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनी यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली असताना शरद पवारांनी मात्र याला 'केवळ अपघात' मानण्याचे आवाहन केले आहे.


विमान कंपनीचा दावा 
'विमानात बिघाड नव्हता': विमान ज्या कंपनीचे होते VSR Aviation, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी स्पष्ट केले आहे की, विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमानाची देखभाल वेळोवेळी केली गेली होती आणि वैमानिकही अनुभवी होते. त्यांच्या मते, कमी दृश्यमानता हेच अपघाताचे प्रमुख कारण असू शकते.

तांत्रिक शक्यता काय? तज्ज्ञांच्या मते, विमान 'वाकडे' होण्यामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात:

विंड शियर : लँडिंगच्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक बदलल्याने विमान एका बाजूला फेकले जाऊ शकते.

इंजिनमधील बिघाड: शेवटच्या क्षणी एका इंजिनने काम करणे थांबवल्यास विमान 'असिमेट्रिक थ्रस्ट'मुळे एका बाजूला झुकू शकते.

Web Title : सीसीटीवी फुटेज से उठे सवाल: अजित पवार के विमान हादसे का रहस्य गहराया

Web Summary : सीसीटीवी फुटेज में अजित पवार का विमान दुर्घटना से पहले अचानक झुकता हुआ दिखा, जिससे तकनीकी खराबी या साजिश की आशंका बढ़ गई है। शरद पवार ने हादसे का राजनीतिकरण न करने का आग्रह किया। विमान कंपनी ने खराबी से इनकार किया, कम दृश्यता बताई। विशेषज्ञों ने विंड शीयर या इंजन विफलता को संभावित कारण बताया।

Web Title : CCTV Footage Raises Questions: Ajit Pawar's Plane Crash Mystery Deepens

Web Summary : CCTV footage shows Ajit Pawar's plane suddenly tilting before crashing, sparking debate about technical failure or foul play. Sharad Pawar urges against politicizing the accident. The aviation company denies any malfunction, citing low visibility. Experts suggest wind shear or engine failure as potential causes.