Ajit Pawar NCP Star Campaigner List: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची कंबर कसून तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली. महापालिकांच्या सत्तासंघर्षात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि मोठ्या नेत्यांची तगडी फौज मैदानात उतरवली आहे. पक्षाची धोरणे आणि विकासकामे जनतेच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि आक्रमक प्रवक्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आले. निवडणूक प्रचार अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावा, या उद्देशाने पक्षाने आपल्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विविध आरोप झालेले धनंजय मुंडे आणि नवाब मलिक दोघांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र नुकतेच मंत्रिपदावरून हकालपट्टी झालेल्या माणिकराव कोकाटेंना वगळण्यात आले आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची नावे-
१. अजित पवार२. प्रफुल पटेल३. सुनील तटकरे४. हसन मुश्रीफ५. धनंजय मुंडे६. नरहरी झिरवाळ७. बाबासाहेब पाटील८. मकरंद जाधव-पाटील९. दत्तात्रय भरणे१०. अण्णा बनसोडे११. अदिती तटकरे१२. इंद्रनील नाईक१३. धर्मराव आत्राम१४. अनिल पाटील१५. संजय बनसोडे१६. प्रताप पाटील चिखलीकर१७. नवाब मलिक१८. सयाजी शिंदे१९. मुश्ताक अंतुले२०. समीर भुजबळ२१. अमोल मिटकरी२२. सना मलिक२३. रूपाली चाकणकर२४. इद्रिस नायकवडी२५. अनिकेत तटकरे२६. झिशान सिद्धिकी२७. राजेंद्र जैन२८. शरद पाटील२९. सिद्धार्थ टी. कांबळे३०. सुरज चव्हाण३१. लहूजी कानडे३२. कल्याण आखाडे३३. सुनील मगरे३४. नाझेर काझी३५. महेश शिंदे३६. राजलक्ष्मी भोसले३७. सुरेखा ठाकरे३८. नजीब मुल्ला३९. प्रतिभा शिंदे४०. विकास पासलकर