महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 19:52 IST2025-11-02T19:30:29+5:302025-11-02T19:52:01+5:30
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. अध्यक्षपदासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक होते. दरम्यान, आता अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला आहे. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग ४ वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे.
अजित पवार यांच्या निवडीने राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचे अधोरेखित झाले आहे.
३१ क्रीडा संघटनांपैकी २२ पेक्षा जास्त संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला आहे. पवार यांची क्रीडा क्षेत्रावर पुन्हा एकदा पकड असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
अजित पवार यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदांवर बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक अध्यक्षपदाच्या निवडीआधी भाजपा-युतीत समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलच्या काही पदाधिकाऱ्यांना पदे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.