शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 06:18 IST

महायुती-मविआत जागावाटपाचे ‘घट’ बसणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शाह यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महायुतीमध्ये आम्हाला विधानसभेच्या किमान ६५  जागा द्या, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चेदरम्यान केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शाह यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली. राष्ट्रवादीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५४ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय काँग्रेस व अपक्ष मिळून पाच आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच, आमच्याकडे जिथे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्या जागा आम्हाला द्या, असे या नेत्यांनी शाह यांना सांगितल्याचे कळते. 

आमची मागणी अजिबात अवास्तव नाही. भरपूर जागा मागायच्या आणि महायुतीच्या जागावाटपात अडचणी निर्माण करायच्या अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही. आम्ही व्यवहार्य भूमिका घेऊनच आपल्याशी बोलत आहोत, असे या नेत्यांनी शाह यांना सांगितले. 

एकनाथ शिंदेंशी चर्चाजागावाटपाबाबत आणि निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केली.मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याचीच माझी भूमिका असते पण त्याचवेळी मित्रांनी अवास्तव मागणी करू नये, असे शाह या चर्चेत म्हणाल्याचे समजते.शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल, त्यांच्याकडे असलेले स्वत:च्या पक्षाचे आमदार, सोबत असलेले अपक्ष आमदार याबाबतची माहिती शाह यांना दिली. तसेच, विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात, अशी मागणी केली.

भाजप १६० जागा लढणार?  nभाजपने १६० मतदारसंघांमध्ये गेले दोन दिवस आपले निरीक्षक पाठवून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून लिफाफ्यामध्ये तीन पर्याय मागविले आहेत. याचा अर्थ भाजप १६० जागा लढणार, असा घेतला जात आहे. nभाजपने जास्तीत जास्त १५५ जागा लढाव्यात, असा अजित पवार गटआणि शिंदेसेनेचाही आग्रह असल्याचे म्हटले जाते.  

‘चर्चा करा आणि फॉर्म्युला ठरवा’तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी पुन्हा एकदा चर्चा करा आणि फॉर्म्युला ठरवा. बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर तुमचे एकमत होणार नाही, हा माझा विश्वास आहे. ज्यावर एकमत होणार नाही तिथे मी स्वत: लक्ष घालेन, असे शाह यांनी या नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.  

टॅग्स :MahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४