शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; CM देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 08:22 IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक मुद्दे समोर आले. अजित पवार-शरद पवार आणि इतर नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी इतकी घाई का करण्यात आली असा मुद्दा विरोधकांनी मांडला होता. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा होता. तो आम्ही घेतला नव्हता असं सांगत मुख्यमंत्र्‍यांनी यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं त्यांनी सांगितले.

तसेच विलीनीकरणाबाबत जो व्हिडिओ बैठकीचा पुढे आला त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षात विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. जर असा निर्णय झाला असता तर अजितदादांना आमचा सल्ला घ्यावा लागला असता कारण आम्ही मित्रपक्ष आहोत. परंतु माझ्यासोबत अजितदादांची अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. जर काही सीक्रेट असेल तर त्याबाबत माहिती नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहेत. DGCA याचा शोध घेत आहे. आम्हीही सीआयडीकडे याची चौकशी दिली आहे. त्याशिवाय कुटुंबाच्या सांगण्यावरून आम्ही सीबीआयलाही पत्र लिहिले आहे. जर कुठलीही शंका अथवा काही माहिती असेल तर त्या तपासणीसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात याव्यात. ही एक संवेदनशील बाब आहे. जेव्हा चौकशी सुरू असते तेव्हा अनुमान लावणे योग्य नाही. आपण मृत व्यक्ती आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांच्या आरोपावर भाष्य करणे टाळले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis reveals who decided Sunetra Pawar's oath-taking date.

Web Summary : CM Fadnavis clarified that the decision to appoint Sunetra Pawar as Deputy CM was solely Nationalist Congress Party's. The BJP had no involvement in the decision or date selection. Merger talks were also beyond BJP's purview.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपा