"मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की..."; रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:26 IST2026-02-12T13:25:50+5:302026-02-12T13:26:55+5:30

Supriya Sule on Ajit Pawar Death Plane Crash Controversy: रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते

ajit pawar death plane crash supriya sule backs rohit pawar allegations says we believe in cm devendra fadnavis | "मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की..."; रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की..."; रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule on Ajit Pawar Death Plane Crash Controversy: २८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या आरोपानंतर काहींनी यात घातपाताची शक्यता वर्तवली. अजितदादांचा पुतण्या आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यावर आज सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली.

मुलांना अनेक प्रश्न पडतात

"रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत शंका उपस्थित केली आहे. दादा गेले हे आजही खरं वाटत नाही. रोहित पवारांची अस्वस्थता साहजिक आहे. मुलांना अनेक प्रश्न पडतात. का झालं, कसं झालं, हे टाळू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. रोहितची अस्वस्थता मी समजू शकते. त्याने त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की, पारदर्शक पद्धतीने चौकशी होईल", अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू

"सुनेत्रा पवार आणि मी अनेकदा काही बैठकांना एकत्रित उपस्थित राहिलो आहोत. पण आताची गोष्ट वेगळी आहे. एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी आमची परिस्थिती आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर आता फार मोठी जबाबदारी आहे. एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहेत तर दुसरीकडे दादा नसण्याचे दुःख आहे. हे दुःख आयुष्यभर राहील. ही प्रेमाची नाती असतात. वेळ हे सगळ्या आजारांवर औषध असते असं म्हणतात. पण काही नाती अशी असतात, त्यांच्या जाण्याने ते दुःख आयुष्यभर राहते. अजितदादा कधीच थकलेले किंवा आराम करताना दिसत नसायचे. आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाहीत", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल...

"शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार. त्यांनी नीट काळजी घेतली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल", अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

Web Title : रोहित पवार के आरोपों पर सुप्रिया सुले ने अजित पवार की 'मौत' पर कहा।

Web Summary : सुप्रिया सुले ने रोहित पवार की अजित पवार की कथित मौत की घटना के बारे में चिंताओं का जवाब दिया। उन्होंने रोहित की बेचैनी को समझा और सीएम के एक पारदर्शी जांच के वादे का खुलासा किया। सुले ने परिवार की मिली-जुली भावनाओं को स्वीकार किया, जिसमें सुनेत्रा पवार ने व्यक्तिगत दुख के बीच जिम्मेदारियां संभालीं। उन्होंने शरद पवार के स्वास्थ्य पर सकारात्मक अपडेट भी साझा किए।

Web Title : Supriya Sule addresses Rohit Pawar's claims on Ajit Pawar's 'death'.

Web Summary : Supriya Sule responded to Rohit Pawar's concerns regarding Ajit Pawar's alleged death incident. She understands Rohit's unease and revealed the CM's promise of a transparent inquiry. Sule acknowledged the family's mixed emotions, with Sunetra Pawar taking on responsibilities amidst personal grief. She also shared positive updates on Sharad Pawar's health.