अजित पवारांनी ट्विटर बायो बदलला; उपमुख्यमंत्री केले, राष्ट्रवादी नेता काढला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 15:55 IST2023-07-02T15:53:54+5:302023-07-02T15:55:17+5:30
Ajit Pawar Oath News Update: अजित पवारांसोबत ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काहीही न बोलता राष्ट्रवादीचे नेते राजभवनातून निघून गेले आहेत. अजित पवारांनी ट्विटवरवरील बायो देखील बदलला आहे.

अजित पवारांनी ट्विटर बायो बदलला; उपमुख्यमंत्री केले, राष्ट्रवादी नेता काढला?
अजित पवारांनी आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांना ४० विधानसभा आमदार, ६ विधान परिषद आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते प्रफुल्ल पटेलही अजित पवारांसोबत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे सरकारला राष्ट्रवादीचाच पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. थोड्याच वेळात शरद पवार पुण्यातून पत्रकार परिषद घेणार आहेत.
याच दरम्यान, अजित पवारांसोबत ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काहीही न बोलता राष्ट्रवादीचे नेते राजभवनातून निघून गेले आहेत. अजित पवारांनी ट्विटवरवरील बायो देखील बदलला आहे.
विरोधी पक्षनेते पदाचा स्टेटस बदलून त्यांनी उपमुख्यमंत्री असा बायो ठेवला आहे. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी नेता हे स्टेटस तसेच ठेवले आहे. यामुळे राज्याचा दिशेला कोणती कलाटणी मिळणार अशी चर्चा रंगली आहे.
राज्यात दुपारनंतर अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजभवनावर पोहोचले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.