शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Last Call: मृत्यूच्या ९ मिनिटांपूर्वी अजितदादांचा कार्यकर्त्याला कॉल; अखेरचं काय बोलले? कॉल रेकॉर्ड समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 09:15 IST

Ajit Pawar Last Phone Call: सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांनी कॉलवर कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. 

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवला. विमानातून लँडिंग होण्यापूर्वी अजितदादांचं कार्यकर्त्यासोबत बोलणे झाले होते. कार्यकर्त्याने केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिले होते असं अजित पवारांशी शेवटचा संवाद साधणारे श्रीजित अरविंद पवार यांनी सांगितले.

श्रीजित पवार हे अजित पवारांचे नात्याने चुलत पुतणे लागतात. श्रीजित यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता. हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होते. तेव्हा रेंज येताच वाचला. त्यानंतर लगेच अजित पवारांनी श्रीजित यांना कॉल केला. याबाबत श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे. सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर ८.३७ मिनिटांनी कॉल माझ्या नंबरवर आला होता. हा त्यांचा शेवटचा कॉल होता असं त्यांनी सांगितले.

अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं दादांनी म्हटलं. १ मिनिटांचा हा कॉलवरील संवाद होता असं श्रीजित यांनी सांगितले. हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा तत्परतेने त्यांना कॉल करत होते. फ्लाईटमध्ये असतानाही जसे त्यांना रेंज मिळाली त्यांनी हा कॉल केला असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. 

अखेरच्या कॉलवर दादा काय बोलले?

अजितदादा - तुम्हाला माहिती नसते, काय नसते..आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा..

कार्यकर्ता - नाही, दादा मला जे वाटले ते तुमच्याशी बोललो

अजितदादा - माहिती आहे, पण तसं नाही, माळी समाजाला मी सुपे गटातून उमेदवारी दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होते. बाकीच्यांनी दिले नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेत, आपण तसे केले नाही.  

कार्यकर्ता - चालेल, दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या

अजितदादा - ठीक आहे, ओके...

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार बारामतीला येणार होते. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने अजित पवार बारामतीला निघाले. मात्र हे विमान बारामतीत लँडिंग होताना त्याचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला. पण सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांनी कॉलवर कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's last call to worker revealed before fatal accident.

Web Summary : Just minutes before his fatal plane accident, Ajit Pawar called a party worker. He assured fairness to all communities regarding candidate selection for local elections and asked the worker to relax. The call highlights his dedication.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जातीDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटना