मोठी बातमी! हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा; तातडीने 'इमर्जन्सी एटीसी' कार्यान्वित; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:50 IST2026-01-28T18:49:49+5:302026-01-28T18:50:40+5:30

Ajit Pawar Baramati Airport Plane Crash: अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणाऱ्या VVIP विमानांच्या सुरक्षेसाठी भारतीय वायुसेनेने इमर्जन्सी ATC सेवा सुरू केली आहे. लोहगाव एअरबेसवरून विशेष पथक दाखल. वाचा सविस्तर.

Ajit Pawar Baramati Airport Plane Crash: Big news! Air Force takes over Baramati airport; 'Emergency ATC' activated immediately; Tight security arrangements for Prime Minister Modi's visit | मोठी बातमी! हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा; तातडीने 'इमर्जन्सी एटीसी' कार्यान्वित; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त

मोठी बातमी! हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा; तातडीने 'इमर्जन्सी एटीसी' कार्यान्वित; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उद्या बारामतीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. ही गंभीर परिस्थिती आणि हवाई सुरक्षेची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाचा ताबा घेतला आहे. 

पुण्यातील लोहेगाव वायुसेना तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण तज्ज्ञांचे एक विशेष पथक तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहे. या पथकाने आपल्यासोबत अत्यावश्यक तांत्रिक उपकरणे आणि संवाद यंत्रणा आणली असून, बारामती विमानतळावर 'इमर्जन्सी एअर ट्रॅफिक कंट्रोल' सेवा सुरू केली आहे.

वायुसेनेने नेमके काय केले?
बारामतीमध्ये कायमस्वरूपी रडार किंवा आधुनिक एटीसी नसल्याने, वायुसेनेने आपली फिरती यंत्रणा बसवून विमानांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण स्थापित केले आहे. विमान आणि जमिनीवरील नियंत्रण कक्ष यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विशेष वारंवारतेची उपकरणे कार्यान्वित केली आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक मुख्यमंत्री विमानाने किंवा हेलिकॉप्टरने बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षित लँडिंगची जबाबदारी आता पूर्णपणे वायुसेनेकडे असणार आहे. 

स्थानिक प्रशासनाशी समन्वय
वायुसेनेचे हे पथक स्थानिक प्रशासन आणि नागरी हवाई उड्डाण विभागाच्या समन्वयाने काम करत आहे. बारामती विमानतळाचा परिसर आता एका लष्करी तळाप्रमाणे सुरक्षित करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर वायुसेनेचे बारीक लक्ष आहे.

Web Title : पीएम मोदी के दौरे के लिए वायुसेना ने बारामती हवाई अड्डे पर कब्ज़ा किया

Web Summary : उपमुख्यमंत्री के निधन के बाद, वायुसेना ने बारामती हवाई अड्डे को सुरक्षित किया। पीएम मोदी सहित वीआईपी आगमन के लिए एक आपातकालीन एटीसी सक्रिय है, जो सुरक्षित लैंडिंग और स्थानीय अधिकारियों के साथ बढ़ी हुई सुरक्षा समन्वय सुनिश्चित करता है।

Web Title : Air Force Takes Over Baramati Airport for PM Modi Visit

Web Summary : Following a deputy CM's death, the Air Force has secured Baramati airport. An emergency ATC is active for VIP arrivals, including PM Modi, ensuring safe landings and heightened security coordination with local authorities.