अजितदादांचा राजीनामा बॉम्ब; राष्ट्रवादीत खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:22 AM2019-09-28T03:22:08+5:302019-09-28T06:47:10+5:30

अचानक सोडली आमदारकी; विधानसभा निवडणुकीला मिळणार नवे वळण

Ajit-Dad resignation bomb; Nationalist agitation! | अजितदादांचा राजीनामा बॉम्ब; राष्ट्रवादीत खळबळ!

अजितदादांचा राजीनामा बॉम्ब; राष्ट्रवादीत खळबळ!

Next

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.

शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यावरून घडामोडी मुंबईत घडताना अजितदादा मुंबईतच राजीनाम्याच्या तयारीत होते. त्यांच्या या हालचालींची शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कोणासही कल्पना नव्हती. उलट, मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवार तिकडे गेलेले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पत्रकारांना सांगण्यात येत होते. पवारांचा गड असलेल्या बारामतीचे अजित पवार हे पाचव्यांदा आमदार आहेत. त्या आधी ते एकदा खासदारदेखील होते. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात तेही एक आरोपी आहेत.

कौटुंबिक वाद की पक्षात अवहेलना?
काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने अजित दादांनी आमदारकीचा राजीनामा दिला की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे, या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा नेमका केव्हा दिला?
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते विधानभवनात गेले. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या खासगी सचिवांकडे राजीनाम्याचे पत्र दिले. तेथूनच त्यांनी अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्या कार्यालयाकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला.

Web Title: Ajit-Dad resignation bomb; Nationalist agitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.