शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

हवाईदलाचे जवान राजेंद्र गुजर पंचतत्वात विलीन

By admin | Updated: July 10, 2017 22:04 IST

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेले हवाईदलाचे जवान राजेंद्र यशवंत गुजर ...

ऑनलाइन लोकमत
(मंडणगड) रत्नागिरी, दि.10 - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेले हवाईदलाचे जवान राजेंद्र यशवंत गुजर (२९) यांच्यावर सोमवारी रात्री त्यांच्या मूळ गावी पालवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वायूदल, सेनादल तसेच स्थानिक पोलिसांनी मंडणगडच्या या सुपुत्राला सलामी दिली. 
 
अरूणाचल प्रदेशात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा मंगळवार ४ जुलै रोजी अपघात झाला. त्यात मंडणगड तालुक्यातील पालवणीचे सुपुत्र आणि वायू दलाचे जवान राजेंद्र गुजर यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. ९ रोजी त्यांचा मृतदेह सापडला. मात्र हवामान खराब असल्यामुळे मृतदेह सापडल्यानंतरही तो त्यांच्या मूळ गावी पालवणी-जांभूळनगर येथे आणण्यास दोन दिवस उलटले. शासन मृतदेह आणण्यासाठी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सोमवारी ग्रामस्थांनी केला. नियोजनानुसार गुजर यांचे पार्थिव रविवारी पालवणीत आणण्यात येणार होते. मात्र खराब हवामानामुळे सोमवारी सकाळपर्यंत हे पार्थिव पालवणीत पोहोचेल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पार्थिव पोहोचायला सोमवारी सायंकाळचे सव्वासात वाजले. शासनाच्या हलगर्जीपणामुळेच एवढा उशीर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
 
गुजर यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता विमानाने मुंबईत आणण्यात आले व तेथून पुढे वायूदलाच्या वाहनातून गावापर्यंत आले. राजेंद्र गुजर यांच्या पालवणी-जांभूळनगर येथील निवासस्थानी हे पार्थिव सव्वासात वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर केवळ १० मिनिटे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले व त्यानंतर गुजर यांचा अखेरचा प्रवास सुरु झाला.
 
अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. ‘राजेंद्र गुजर अमर रहे’ अशा घोषणा देत परिसरातील ग्रामस्थ, त्याचबरोबर आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह उत्तर रत्नागिरीतील सर्व नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी या अंत्ययात्रेत सामील झाले होते.
 
रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गुजर यांचे वडील यशवंत गुजर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी सेनादल, वायूसेना व स्थानिक पोलिसांनी राजेंद्र गुजर यांना अखेरची सलामी दिली. 
 
गाडीचा वेगही मंदावला-
वायूसेनेच्या गाडीचा वेग मंदावल्याने मृतदेह पालवणीपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. १२ वाजता मुंबईत दाखल झालेले राजेंद्र गुजर यांचे पार्थिव गावी पोहोचण्यास तब्बल सात तास लागले. घाटातून तर ही गाडी अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. 
 
महिलांची लक्षणीय उपस्थिती-
गुजर कुटुंबियातील यशवंत गुजर हे ही सैन्यात होते तर आताच्या पिढीतील राजेंद्र व त्यांचा मोठा भाऊ शाम हेही दोघे सैन्यात आहेत. त्यामुळे राजेंद्र गुजर यांच्या मृत्यमुळे परिसर हेलावून गेला होता. ग्रामीण भागात स्मशानापर्यंत न जाणारा महिलावर्गही आपल्या लाडक्या सैनिकाला निरोप देण्यासाठी थेट स्मशानभूमीपर्यंत जाताना दिसला. लाडक्या सैनिकाला निरोप देताना साºयांचे डोळे पाणावले.