Ahmednagar Hiware Gaonbazar Corona free Village In Maharashtra-SRJ | ...म्हणून 'या' गावात कोरोनाचा शिरकाव टळला; सुरूवातीपासूनच आहे कोरोनामुक्त!

...म्हणून 'या' गावात कोरोनाचा शिरकाव टळला; सुरूवातीपासूनच आहे कोरोनामुक्त!

जेव्हा कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण देश अडकला होता. तेव्हा मात्र महाराष्ट्रातील एक गाव सुरूवातीपासूनच योग्य ती खबरदारी घेत होता. कोरोनाने साऱ्यांनाच धडकी भरवली आणि परिणामी असंख्य नागरिकांनी गावी जाण्यासाठी पायपीट करत आपले घर गाठले. 
शहरांतून गावाकडे पलायन केलेल्यामुळे देखील गावात कोरोनाने शिरकाव केला. परिणामी इतरांमुळे गावक-यांनाही कोरोनाने चांगलीच धडकी भरवली असताना एक गाव आहे. जो आजही कोरोनामुक्त आहे. या गावात एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही. 
आज या गावाचे विशेष कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावात  कोरोनाला गावात एंट्रीच दिली नाही. कोरोनाच्या संकटात हे गाव अगदी निर्धास्त आहे आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनासाचा प्रादुर्भाव सुरू होताच पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नाही.


गावकरीही सोशल डिस्टंसिंगचे नित्यनियमाने  पालन करताना दिसून येतात. तसंच गावातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने गावातील शंभर टक्के नागरिकांची नियमित तपासणी सुरू ठेवत सर्वांच्या आरोग्यावर नजर ठेवली आहे. गावक-यांनी घेतलेल्या योग्य खबरदारीमुळेच आज गाव बिनधास्त आपले आयुष्य जगत आहे. आज या गावाने सा-यांसमोर एक आदर्शच निर्माण केलं आहे. त्यामुळं घरात राहा सुरक्षित राहा याबरोबरच आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ahmednagar Hiware Gaonbazar Corona free Village In Maharashtra-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.