राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष नव्याने मोर्चेबांधणी करत आहेत. महाविकास आघाडीतील काही मित्रपक्षांना गळती लागल्याचे दिसत आहेत. ठाकरे गटाला काल धक्का बसला. कोकणातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मंगळवारी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आज शरद पवार गटालाही धक्का बसला. श्रीगोंदा तालुक्यातील शरद पवार गटातील अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच आणि बेलवंडी व्यापारी पतसंस्था चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार - उत्तमराव डाके, तांदळी दुमालाचे सरपंच व उद्योजक संजय निगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार विक्रमसिंह पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, शहर अध्यक्ष धनराज कोथिंबीरे आदी यावेळी उपस्थित होते.
मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुदेश (बंडू) मांडे यांच्यासोबत तांदळी दुमाला येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपा प्रवेश केला. यामध्ये माजी सरपंच देविदास भोस, विद्यमान उपसरपंच संतोष हराळ, माजी उपसरपंच तुषार धावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास गंगाधरे, नरसिंग भोस, झुंबर खरांगे, संतोष बोरुडे, तांदळेश्वर सोसायटीचे माजी संचालक प्रवीण काळेवाघ, जयसिंग भोस, कुंडलिक काळेवाघ, दगडू काळेवाघ आदींचा समावेश आहे.