'राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो'; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:05 IST2026-02-13T11:45:04+5:302026-02-13T12:05:27+5:30

मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून मोठा दावा करण्यात आला आहे.

'After the merger with NCP, we were going to hand over the party leadership to Ajit Pawar'; Big claim from Sharad Pawar group's weekly | 'राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो'; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

'राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो'; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरणबाबत चर्चा सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या काळातच दोन्ही पक्ष एकत्र करण्याबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका झाल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान, आता 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या साप्ताहिकातून मोठा दावा करण्यात आला आहे. "विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता", असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षीय लेखात म्हटले आहे.

"चौकशीत माझं नाव आलं तर राजीनामा देईन"; लिपिकाला लाच घेताना अटक, झिरवाळांचे थेट आव्हान

साप्ताहिकेतील या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी याबाबत अनेक दावे केले होते. यासाठी बैठकाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता शशिकांत शिंदे यांनी  साप्ताहिकात मोठा दावा केला आहे.

"विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल",असंही शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकामध्ये म्हटले आहे.

Web Title : विलय के बाद अजित पवार को नेतृत्व सौंपने की योजना: पवार गुट।

Web Summary : शरद पवार गुट का दावा है कि विलय के बाद अजित पवार को नेतृत्व सौंपने की योजना थी। अजित दादा की मृत्यु के बाद पार्टी एकता की चर्चा के बीच यह दावा सामने आया है। कथित तौर पर नेताओं ने इस उद्देश्य के लिए बैठकें की थीं।

Web Title : NCP planned to hand leadership to Ajit Pawar post-merger: Pawar faction.

Web Summary : Post-merger, NCP intended to give leadership to Ajit Pawar, says Shashikant Shinde. This claim surfaces amidst discussions about party unification after Ajit Dada's death. Leaders had reportedly held meetings for this purpose.