फुटीनंतर पक्षाला बळ, लोकसभेत मिळाले यश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कारकीर्द कशी होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:58 IST2025-07-15T18:56:37+5:302025-07-15T18:58:26+5:30

NCP SP Group Jayant Patil News: लोकसभेत १० पैकी ८ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले.

after split the party gained strength and achieved success in the lok sabha election 2024 know about how was the career of jayant patil as a ncp sp group state president | फुटीनंतर पक्षाला बळ, लोकसभेत मिळाले यश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कारकीर्द कशी होती?

फुटीनंतर पक्षाला बळ, लोकसभेत मिळाले यश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कारकीर्द कशी होती?

NCP SP Group Jayant Patil News: अखेर शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.  २०१८ साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले. 

२०१८ च्या शेवटापर्यंत परिस्थिती प्रचंड बदलेली होती. अनेक जण पक्ष सोडून जात होते. २०१९ च्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या. या परिस्थितीत आम्ही हार मानली नाही. लढत राहिले, नवे लोक पक्षाशी जोडत राहिले. डॉ. अमोल कोल्हे सारखे नेते पक्षात आणण्यात यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ४ जागा निवडून आल्या. बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर… हे अपयश पचवून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रा - १ काढली, शिवनेरीला नतमस्तक होऊन काढलेल्या या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.

पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती 

पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. शिव स्वराज्य यात्रा स्थगित करून लोकांच्या मदतीला धावले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना निर्देश होते की जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता प्रत्येकाच्या मदतीला धावा, परिस्थिती सावरण्याची जबाबदारी ही आपली आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले. तब्बल ५४ जागा निवडून आल्या. शरद पवार यांच्या किमयेने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत परतले. महाविकास आघाडीत जलसंपदा मंत्री म्हणून काम केले. सत्तेत आलो म्हणून शांत बसले नाही तर विविध उपक्रम राबवले.

८ लाख कार्यकर्त्यांनी नोंदवला अभिप्राय 

२०२० साली राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाइन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना थेट पवार साहेबांशी जोडून दिले. जवळपास ८ लाख कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला. २०२१ साली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात गेले. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेले. भाषणे न करता तेथील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. २०२२ साली परिवार संवाद यात्रेची सांगता सभा कोल्हापूरच्या तपोवन मैदानात पार पडली, त्या सभेला संकल्प सभा नाव देण्यात आले. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर एकचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला. त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी महापुरुषांच्या विचारांसाठी हा उपक्रम हाती घेतला.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण ठिकठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चे काढले. २०२३ साली पक्ष फुटला. त्यावेळी पवारांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत संवाद दौरा काढण्यात आला. पक्षात जी फुट निर्माण झाली ती सांगण्यासाठी ‘टू द पॉईंट’ ही पॉडकास्ट सिरीज सुरू केली. डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडली. लोकसभेत १० पैकी ८ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक भागात स्वाभिमान सभा घेतली. बीड, येवला, जळगाव ठिकठिकाणी या सभा घेत पक्षाने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. या दौऱ्याच्या माध्यमातून कोणता लोकसभा मतदारसंघ आपण लढवला पाहिजे, उमेदवार कोण असू शकतो, आपले सैन्य खाली किती तयार आहेत? काय काय सुधारणा आमदारांनी व तेथील उमेदवारांनी केली पाहिजे याची चाचपणी केली आणि त्यानुसार व्युहरचना आखली. 

 

Web Title: after split the party gained strength and achieved success in the lok sabha election 2024 know about how was the career of jayant patil as a ncp sp group state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.