शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

नवजा, पाथरपुंज येथे नाही, तर यावर्षी 'या'ठिकाणी झाली सर्वाधिक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:00 IST

विकास शहा शिराळा : सातारा जिल्ह्यातील नवजानंतर पाथरपुंज येथे सर्वात जास्त पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी १ जूनपासून दि. ...

विकास शहाशिराळा : सातारा जिल्ह्यातील नवजानंतर पाथरपुंज येथे सर्वात जास्त पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी १ जूनपासून दि. १५ जुलैअखेर याच जिल्ह्यातील सांडवली या ठिकाणीसुद्धा पाथरपुंजबरोबर पाऊस पडला आहे.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे २०१९ मध्ये चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे हे नाव जगाच्या पटलावर चर्चेत आले होते. यावर्षी मात्र दि. १५ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सांडवली येथे ३११२ मिमी तर पाथरपुंज येथे ३१३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता सांडवली येथे पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले असून, तेथे २८७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हा पावसाच्याबाबत अग्रेसर आहे. कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सर्वात जास्त पाऊस पडतो.यावर्षी सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज ३१३९, महाबळेश्वर २२२८, कोयना २३४९, नवजा २२०३, सोनाट २३३४, ठोसेघर १९१०, जोर २५२१ बामणोली १७८०, कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे २८७१, दाजीपूर २४३९, गगनबावडा २३१८, जांभूर १७२६, सांगली जिल्ह्यातील धनगरवाडा १६४९, चांदोली १६८१, चरण १३४१, अशी पावसाची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज व कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे याप्रमुख ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे चांदोली धरण भरले जाते.

बऱ्याचदा बदल हा वॉटर सायकलशी संबंधित असतो, त्याचा अंदाज लावता येत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सरासरी पावसाच्या दुप्पट पाऊस होऊ लागला आहे. ज्या भागाची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ४०० मिलिमीटर आहे, तेथे गेल्यावर्षी अकराशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान विभाग सांगली